Year 2018-19
श्री रालतो विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण कार्यक्रम संपन्न. 182 विद्याथ्र्यांना पदवी वितरण. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देषानुसार पदवी वितरण कार्यक्रमाचे
आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात थाटात संपन्न झाले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत सत्र 2018-19 मध्ये बी.एस्सी. व एम.एस्सी गणित, रसायनषास्त्र आणि सुक्ष्मजीवषास्त्र मधिल या अभ्यासक्रमात विद्यापीठातून मेरीट आलेले विद्यार्थी, प्रथम श्रेणीत व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांना विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली.
प्रारंभी अमरावती विद्यापीठाचे आराध्य दैवत संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विद्यापीठ गिताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पदवी वितरण कार्यक्रमाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे डाॅ.अविनाष मोहरील, अधिश्ठाता, मानव विज्ञान विद्याषाखा हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.विजय नानोटी होते. तर मंचावर डाॅ.उमेष भालेकर, डाॅ.राजेष चंद्रवंषी, IQAC समन्वयक डाॅ. राजेंद्र रहांटगांवकर, डाॅ. सुषिल नगराळे, दिपक वानखडे आदी उपस्थित होते.
Year 2019-20
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देषानुसार पदवी वितरण समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवार, दि 29 जून 2021 रोजी आभासी पध्दतीने संपन्न झाले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सत्र 2019-2020 मध्ये B.Sc. व M.Sc. रसायनशास्त्र या अभ्यासक्रमात विद्यापीठातून मेरीट आलेल्या विद्यार्थीनी यांना प्रातिनिधिक स्वरुपात पदवी बहाल करण्यात आली. शासनाच्या कोविड 19 संदर्भातील मार्गदर्षक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन सत्र 2019-2020 मध्ये पदवी प्राप्त विद्याथ्र्याकरिता हा समारंभ आभासी पध्दतीने आयोजित करण्यात आला.
प्रारंभी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करुन विद्यापीठ गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पदवी वितरण समारंभाला मा. डाॅ.देवेंद्र व्यास, प्राचार्य, श्रीमती रा. दे. गो.महिला महाविद्यालय, अकोला प्रमुख अतिथी म्हणुन लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विजय नानोटी होते तर मंचावर पदवी वितरण समितीचे समन्वयक डाॅ. राजेष चंद्रवंषी व IQAC समन्वयक डाॅ. राजेंद्र रहाटगांवकर उपस्थित होते. कार्यक्रमांच्या सुरुवातीला पदवी वितरण समितीचे समन्वयक डाॅ. राजेष चंद्रवंषी यांनी सत्र 2019-2020 च्या निकालाचा गोशवारा सादर केला.
मेरीट मध्ये स्थान प्राप्त केलेल्या रसायनशास्त्र पद्व्युत्तर विभागातील गुणवंत विद्यार्थीनी कु. श्रध्दा हातगांवकर, कु. रोषनी ग्वालानी, कु. अंजली यादव, कु. कोमल ठाकरे व बी.एस्सी. मध्ये विद्यापीठात मेरीट असलेली विद्यार्थीनी कु. जानकी देशमुख यांच्यासह पदवी व पद्व्युत्तर विभागातील प्रथम श्रेणीत उत्र्तीण झालेल्या विद्याथ्र्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्षक मा. डाॅ.देवेंद्र व्यास यांनी महाविद्यालयाचा इतिहास हा गौरवपुर्ण असुन महाविद्यालयाच्या यषाबद्दल अभिनंदन केले. त्यांच्या मार्गदर्षनातून विद्याथ्र्यानी कौषल्य षिक्षण आत्मसात करुन यषस्वी वाटचाल करावी असे आवाहन केले. यानंतर मेरीटमध्ये आलेल्या 04 विद्याथ्र्याना प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या षुभहस्ते पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाशणात डाॅ. विजय नानोटी यांनी गुणवंत व पदवी प्राप्त विद्याथ्र्याचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात तसेच संपादन केलेले हे अभुतपुर्व यष हे महाविद्यालयाच्या इतिहास व गुणवत्तेच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरेल असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन डाॅ. आषिश सरप यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. अंजली सांगोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यषस्वीतेकरिता प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी, षैक्षणिक कर्मचारी व सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
Year 2020-21
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देषानुसार पदवी व पदविका वितरण समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात षुक्रवार, दि. 5 आॅगस्ट, 2022 रोजी संपन्न झाले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सत्र 2020.21 मध्ये B.Sc. व M.Sc. गणित, रसायनशास्त्र व सुक्ष्मजीवशास्त्र या अभ्यासक्रमात विद्यापीठातून मेरीट आलेल्या विद्याथ्र्यांना पदवी बहाल करण्यात आली. प्रारंभी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करुन विद्यापीठ गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पदवी वितरण समारंभाला डाॅ.राजीव बोरकर, संचालक, विद्यार्थी विकास कक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती प्रमुख उपस्थितीत लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विजय नानोटी होते तर मंचावर पदवी वितरण समितीचे समन्वयक डाॅ. राजेष चंद्रवंषी व IQAC समन्वयक डाॅ. राजेंद्र रहाटगांवकर, डाॅ.एस.एम. नगराळे, डाॅ.ए.जी.सरप, डाॅ.के.एम. हेडा, डाॅ.अे.अे.सांगोळे, डाॅ.आर.एम.अग्रवाल, श्री.मंगेष उबाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमांच्या सुरुवातीला पदवी वितरण समितीचे समन्वयक डाॅ. राजेष चंद्रवंशी यांनी सत्र 2020-21 च्या निकालाचा गोशवारा सादर केला. मेरीट मध्ये स्थान प्राप्त केलेल्या सुक्ष्मजीवशास्त्र पद्व्युत्तर विभागातील गुणवंत विद्यार्थीनी राजेश्वरी विजय चव्हाण, रसायनशास्त्र विभागातील अंकिता बळीराम पोटदुखे व गणीत विभागातील सायली मानिकराव काळमेघ यांच्यासह पदवी व पद्व्युत्तर विभागातील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्षक डाॅ.राजीव बोरकर यांनी पदवी प्राप्त विद्याथ्र्यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा वसा घेवुन समाज कार्य करावे. यानंतर मेरीटमध्ये आलेल्या 03 विद्याथ्र्याना व इतरही विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या षुभहस्ते पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाशणात डाॅ. विजय नानोटी यांनी गुणवंत व पदवी प्राप्त विद्याथ्र्याचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन श्री. मंगेष उबाळे यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. रोहीतकुमार अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापकवृंद, प्रषासकिय कर्मचारी, षैक्षणिक कर्मचारी व सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.