Notice: Ph.D. Programme & Course Work Admission 2025-2026. Click here for details.
दि.२ ऑक्टोबर २०१९ महात्मा गांधीजी ह्यांची १५०व्या जयंतीला श्री रा.ल.तो. विज्ञान महविद्यालयाच्या रासेयो पथकाने अकोला महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजयजी कापडणीस,आयुक्त म.न.पा. अकोला, हे होते.
रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रश्मी जोशी ह्यांनी एक आगळ्यावेगळ्या स्वछता कार्यक्रमाचे आयोजन केले. “Single plastic ban” ची संकल्पना साकारली व प्लास्टिक पिशव्यांना संपूर्ण बंदी घातली.
प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालून कापडी पिशव्यांचे अनावरण केले व महाविद्य्लायात्ल कर्मचर्यांना तसेच विद्यार्थ्यांना शपथ दिली. अकोला म.न.प. आयुक्त ह्यांनी आपल्या आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता आव्हान केले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वच्छता रेली चे आयोजन केल्या गेले. पथनाट्या व प्लास्टिक बंदीचे नारे लावत, पोस्टर्स वर घोश्वाक्यांच्या माधमातून जनजागृती करण्यात आली.






