“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन

श्री रा.ल.तो.विज्ञान महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या पंधरवड्या अंतर्गत महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात सामूहिक वाचन व वाचन कौशल्य कार्यशाळा दि. 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री मंगेश उबाळे यांनी केले व कार्यक्रमाचे संचालन रा. सो. यो कार्यक्रम अधिकारी डॉ. शैलेश जयस्वाल यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी रा .स .यो विभागाच्या महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. कविता हेडा ,भाषा विभागाचे प्रमुख प्रा.अरुण खेडकर व एन.सी.सी विभागाचे लेफ्टनंट डॉक्टर रोहित कुमार अग्रवाल उपस्थित होते.

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री.मंगेश उबाळे यांनी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देऊन कार्यक्रमाचा हेतू उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश चंद्रवंशी यांनी विद्यार्थ्यांना वाचन कसे करावे, नेमके काय वाचावे याबद्दलचे मार्गदर्शन केले व वाचनाने युवकांचा सर्वांगीण विकास कसा होतो व तो समाजाच्या तसेच राष्ट्राच्या प्रगतीत कसा समाविष्ट होऊ शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील ग्रंथालय कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्ग व महाविद्यालय कर्मचारी वर्ग उपस्थित होते.