श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय अकोला च्या प्रिन्सिपाल्स ब्रिगेड आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या आपत्ती विषयक जनजागृती व आपत्ती शोध बचाव कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय अकोला तर्फे जिल्हाधिकारी महोदया निमा अरोरा यांचे हस्ते महाराष्ट्र दिन कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांचे मार्गदर्शनाखाली कक्षाचे समन्वयक, डॉ. सुधीर कोहचाळे तसेच प्राध्यापक शैलेंद्र मडावी व प्राध्यापक शंकेश झायटे समवेत कक्षाने बचाव व मदतकार्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. 2015 पासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत असून विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे क्षमन कार्यात कक्षाने उत्कृष्ट योगदान दिले आहे.
महाविद्यालयात दरवर्षी 30 विद्यार्थी या कक्षात प्रशिक्षित होऊन विविध बचाव कार्यात आपला सहभाग नोंदवतात. या सन्मान व सत्कार याबद्दल दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोतीसिंहजी मोहता, माननीय मा. सचिव पवनजी माहेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी तसेच समस्त पदाधिकारी तर्फे व समाज माध्यमातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.




