कोविड-१९ बद्दल रासेयो पथकाची कार्ये व जनजागृती

श्री राधाकिसन लक्ष्मिनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालय, अकोला
अ.क्र. :- २१०
कोविड-१९ या वैश्विक महामारी बद्दल रासेयोच्या पथकाने केलेली कार्ये व जनजागृती –

  • सहभागी विद्यार्थ्यांची संख्या :- ५०
  • कार्याचा तपशील *
    १) महाविद्यालयीन परिसरामध्ये फ्लेक्स लाऊन कोरोना विषाणू संक्रमण थांबवण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
    २) कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ. रश्मी जोशी ह्यांनी (WHO) World Health Organization चे “Infection Prevention and Control for Novel Coronavirus” हे प्रशिक्षण पूर्ण केले.
    ३) रासेयो च्या अमिषा मिश्र व हृतुजा गोपनारायण ह्या विद्यार्थिनीनी स्वतःच्या घरी राहून कापडी मास्क तयार केलेले आहे. व ते मास्क GMC अकोल्याला देण्यात आले आहे. ह्या विद्यार्थिनींचे जेवढे कवतुक करावे तेवढे कमी.
    ३) रासेयो कार्यक्रम अहिकारी म्हणून काही गरीब व गरजू परिवारांना NGOs जसे भारतीय जैन संघटना च्या माध्यमातून Food Kits चे वितरण केले आहे.
    ४)महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. नानोटी ह्यांनी कॉलेज च्या वेबलिंक वर चित्रफित च्या माद्यमातून स्वतः जनजागृती करण्याचे काम केले.
    ५) रासेयो प्रतिनिधींनी गरिबांना व ते राहतात त्या परिसरातील लोकांना औषधी,मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
    ६) घरी सुरक्षित राहून व्हॉट्स अॅप, फेसबुकद्वारे विद्यार्थ्यांनी संदेश पोहोचवला.
    ७) महाविद्यालय व दत्तक ग्राम आपोती खुर्द येथे कोरोना व्हायरस संबंधित समज-गैरसमज याविषयी सरपंच, उपसरपंच ह्यांच्या व्हाटसअप व फासिबुक च्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवून प्रत्येकाने स्टेटस ठेवून जनजागृती केली. 10 जणांना आपापल्या गावातील लोकांना कोरोना विषयक माहितीचा प्रसार केला.
    ९) मा. पंतप्रधान यांच्या आवाहना नुसार आरोग्य सेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करून सर्वांनी नोंदणी केली तसेच स्वयंसेवकांनी त्यांच्या गावामध्ये लोकांना आरोग्य सेतू अॅप विषयी माहिती देऊन इतरांनाही डाऊनलोड करून त्याच्ये फायदे सांगितले व प्रोत्साहित केले.
    १०) शासनाच्या आव्हानानुसार विद्यार्थी स्वच्छेने मुख्यमंत्री / पंतप्रधान निधीस आर्थिक मदत करीत आहेत.
    मा. प्राचार्य डॉ. नानोटी, क्षे. सम. डॉ. सुधीर कोह्चाले, कार्यक्रम अधिकारी डॉ. रश्मी जोशी. डॉ. समाधान मुंडे व प्रा. शैलेश जैस्वाल यांच्या आदेशानुसार स्वयंसेवक कार्यरत आहेत आणि भविष्यातही करत राहतील.
    “NOT ME BUT YOU”
    डॉ. रश्मी पी. जोशी
    डॉ. समाधान मुंडे
    रासेयो, कार्यक्रम अधिकारी