श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ह्या दरम्यान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर सत्र २०१९-२० हे ग्राम आपोती(खुर्द) येथे दि. ०७/१२/१९ ते १४/१२/१९ ह्या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. रविवार दि.०८/१२/१९ ला शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबीरादर्म्यान काही विशेष प्रकल्प राबविण्यात आले. जसे उन्नत भारत अभियान दरम्यान दत्तक ग्राम अपोती (खु.) सोबत चार इतर गावांचे परिवार सर्वेक्षण प्रपत्र भरण्यात आले. आपोती (खु.)- १६३, अपोती (बु.)- १४४, आपतापा – २३१, आखतवाडा- १३० आणि सुलतानपूर – ३० इतक्या परिवारांची माहितीचे प्रपत्र रासेयो चमू द्वारे भरण्यात आले. दि.१०/१२/१९ सोमवार रोजी कायदे विषयक मार्गदर्शनपर शिबीर, मान. Adv. श्री मोतीसिन्ह्जी मोहता, मानद सचिव, दि. बेरार जनरल एजु. संस्था, अकोला व जिल्हा विधी प्राधिकरण सेवा द्वारे आयोजित करण्यात आले. ११/१२/१९ बुधवार रोजी महिला-मेळावा आयोजित करण्यात आला व “सोयाबीन प्रशिक्षण कार्यशाळा” घेण्यात आली व अध्यक्ष म्हणून लाभल्या मान. सौ. वनिता कदम, दै.सकाळ, तनिष्क समन्वयिका. सोयाबीन पासून दूध, गुलाबजाम, चकली, पनीर ई. पदार्थ गावातील महिलांना शिकविण्यात आले जेणेकरून कि त्या महिलांना घरगुती उद्योग सुरु करता यावे.
मेळाव्यात एक आगळीवेगळी स्पर्धा, “आजीचा बटवा” घेण्यात आली. ह्या स्पर्धेत औषधी गुण असलेल्या पदार्थानचे गुणधर्म सांगायचे होते, ह्या स्पर्धेला महिलांचे उत्स्फूर्त प्रातिसाद लाभले. ७५ महिलांनी आपला सहभाग नोंदविला आणि त्या पैकी तीन पारीतोषीके देण्यात आली. दि. १२/१२/१९ गुरवार ला “मासिक पाळी एक वरदान” ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले. व्याख्यानं करिता मान. सौ. स्नेहल चौधरी कदम, क्षितीज फाउंडेशन च्या अध्यक्षा तसेच SDPO city च्या धर्मपत्नी, ह्यांनी गावातील शाळेच्या ६६ मुली व शिबिरातील ७० मुलींचे मार्गदर्शन केले. गावातील वरिष्ठ नागरिकां करिता “मोतीबिंदू मुक्त गाव” हे मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित केले गेले. ह्या प्रकल्पा अंतर्गत नेत्र रोगतज्ञ डॉ. शिरीष थोरात ह्यांचे सहकारी डॉ. रितेश कोटेचा ह्यांनी ८३ गावकर्यांचे डोळे तपासले, त्यापैकी २७ लोकांना मोतीबिंदू असल्याचे दिसून आले व ७ रुग्णांना ऑपरेशन करिता थोरात हॉस्पिटल ला बोलाविण्यात आले. दि. १३/१२/१९ शुक्रवार रोजी श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून गावातील ९ वी आणि १० वी च्या १०० शालेय विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी शिबीर घेण्यात आले.
हे शिबीर सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख मान. डॉ.यु. के. भालेकर व प्राध्यापिका सोनाली गवांदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते . शिबिरादरम्यान रोज प्रभात फेरीच्या माध्यमातून स्वच्छतेचे, एड्स जनजागृती बद्दलचे, पर्यावरण संवर्धनाचे व प्लास्टिक बंदीचे आव्हान केल्या गेले. गावातील सांडपाण्याची व्यवस्था करण्याकरिता दोन नाल्यांची निर्मिती करून दोन शोष खड्डे ५५६ चे श्रमदानातून निर्माण केल्या गेले. गावातील लोकांनी सुद्धा श्रमदानला आपला सहभाग नोंदविला. शनिवार दि.१४/१२/२०१९ रोजी शिबिराचे समारोप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री सत्यनारायणजी बाहेती, कार्य. सदस्य, दि बी.जी.ई. सोसायटी,अकोला ह्यांनी भूषविले तसेच मान. श्री शांतारामजी बुटे, संस्थापक, क.शि.प्र.संस्था, आपातापा, हे प्रमुख पाहुणे होते. मान. श्री अनिलजी तापडिया, कार्य. सदस्य, दि बी.जी.ई. सोसायटी, अकोला. महाविद्यालयाचे प्राचार्य मान. डॉ. वी.डी. नानोटी, मान. श्री दामोदार्जी कडू, अध्यक्ष, क.शि.प्र.संस्था, आपातापा, सौ. लक्ष्मीताई घुशे, सरपंच, आपतापा, श्री कैलासरावआपोतीकर, पोलिस पाटील, आपातापा ह्यांची विशेष उपस्थिती होती. सत्र २०१९-२० च्या रासेयो विशेष शिबिराच्या आयोजन व विविध प्रकल्प राबविण्या करिता कार्यक्रम अधिकारी डॉ. रश्मी जोशी सावलकर ह्यांनी परिश्रम घेतले तसेच शिबिराच्या यशस्वीते करिता डॉ. समाधान मुंडे, प्रा. शीलेश जैस्वाल ह्यांनी प्रयत्न केले. शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता रासेयोचे गटप्रमुख हृतुजा गोपनारायण व अखिलेश पुराणिक ह्यांच्या मार्ग्दर्षांखाली शिबिरार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.