दि.१५ ऑगस्ट २०१९, स्वतंत्रता दिवस व रक्षाबंधन चे औचित्य साधून एक अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाच्या रा.से.यो. महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.रश्मी जोशी सावलकर व डॉ समाधान मुंडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा मुली स्वयंसेवीकांना रोपं वितरीत करण्यात आली , व त्या रोपांना त्या मुलींच्या हस्ते राखी बांधून, आपल्या भावासारखे त्यांचे संरक्षण व संगोपन करण्याची शपथ देण्यात आली कि,
“हम आज रक्षाबंधन के उपलक्ष मे ये शपथ लेते हे कि, हम पौधे लगायेंगे, उनकी देखभाल करेंगे. हम अपने आसपास जो भी उचित स्थान होगा, उसमे ये पौधे लगायेंगे और उनका संगोपन करेंगे. इसके साथ हि पशु-पक्षीयो कि रक्षा और उनका संरक्षण भी करेंगे”.
कार्याक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मान. डॉ. नानोटी हे होते व रासेयो क्षेत्रीय समन्वयक डॉ. कोहचाले ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.

