विद्यापीठस्तरीय पुरस्कार २०१९

राष्ट्रीय सेवा योजना सत्र 2018-19 विद्यापीठ स्तरीय पुरस्कार समारोहात मा. कुलगुरू मुरलीधरजी चांदेकर यांचे हस्ते विद्यापीठ स्तरीय जिल्ह्यातील उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार श्री. रा ल तो विज्ञान महाविद्यालय अकोला ला प्राप्त झाला.

मा. प्राचार्य डॉ. विजय नानोटी क्षेत्रीय समन्वयक डॉ. सुधीर कोहचाळे कार्यक्रम अधिकारी समाधान मुंडे व स्वयंसेवक याना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करताना मा. कुलगुरू मुरलीधरजी चांदेकर रासेयो समन्वयक राजेश बुरंगे व इतर मान्यवर या समारंभात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे उत्कृष्ट सहभागाबाबत रालतो विज्ञान महाविद्यालय अकोला चे मान्यवरांनी कौतुक केले.