अमरावती येथे विद्याभारती कॉलेज मध्ये नुकतीच १ व २ फेब्रुवारी रोजी, युजीसीने स्पॉन्सर केलेली नॅशनल लेवल कॉन्फरेन्स (Emerging Trends in Science) घेण्यात आली. या मध्ये अकोल्याच्या रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात बी.एस्सी. फायनल मध्ये शिकणाऱ्या यश विद्यासागर याने पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
त्याच्या या पेपरचे नाव आहे: Microcontroller Based TechEye System for Obstacle Detection & Ranging to Assist Blind Person.
त्याने आंधळ्या लोकांसाठी एक इंटेलिजन्ट काठी तयार केली. या काठी मध्ये त्याने मायक्रो कंट्रोलर वापरून सर्किट तयार केले आणि त्याचे विशिष्ट पद्धतीने कोडींग केले.
ही काठी घेऊन चालणाऱ्या व्यक्तीसमोर आलेल्या अडथळ्यांना ओळखून हे सर्किट वेगवेगळ्या पद्धतीने बीप-बीप असा आवाज देते आणि आंधळ्या व्यक्तीस सतर्क करते. समोर असलेला अडथळा दूर असल्यास वेगळा आवाज आणि जसजसा अडथळा जवळ येईल त्याप्रमाणे या आवाजात बदल होऊन त्या व्यक्तीस अचूकपणे सतर्क करता येते.
वेगवेगळ्या वयोगटातील आंधळ्या व्यक्तींवर, यशने प्रथम या काठीचा प्रयोग करून पहिला. या सर्व व्यक्तींशी संवाद साधून, त्यांच्या सूचनांप्रमाणे आणि असंख्य निरीक्षणे आणि टिपणे घेऊन त्याने या प्रोजेक्ट मध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या आणि अतिशय अचूक अशी ही सिस्टिम तयार केली.
हा प्रोजेक्ट तयार करताना श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. नानोटी, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. चव्हाण, प्रा. चौधरी, डॉ. मालपाणी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.